
‘ स्वप्ने पूर्ण होतातच शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे’ : डॉ.प्रमोद बोराडे
वडगाव मावळ:
‘ स्वप्ने पूर्ण होतातच यासाठी फक्त शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे’ असा विश्वास डॉ.प्रमोद बोराडे यांनी दिला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहितेवाडी(साते) येथे शिवचरित्रावर व्याख्यान करताना बोराडे बोलत होते.
इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागात फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जाते.मोहितेवाडी मध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली.
गावामध्ये दारोदारी रांगोळी पायघड्या व भगवे झेंडे लावत नागरिकांमध्ये उत्साह दिसत होता.हनुमान मंदिर पटांगणामध्ये डॉ.बोराडे त्यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर होते.
“तरुणांनी स्वप्न पहावे व त्यामागे ध्येयाने उठून पाठलाग करावा हेच शिवचरित्र शिकवते” असे डॉ बोराडे यांनी सांगितले.म्हाळस्कर यांनी वडगाव मध्ये गेली ४५ वर्षे अविरत सुरु असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे उदाहरण दिले.म्हाळसकर म्हणाले,”मोहितेवाडीमधील तरुणांनी सुरु केलेले व्याख्यान कार्यक्रमाचे रोपटे भविष्यात भव्य वटवृक्षाप्रमाणे वाढेल.कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील महिलांची संख्या मोठी होती.
कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरुण तरुणी यांनी एकत्र येत केले. तसेच मुंबई पोलीस मध्ये नियुक्ती झालेले नागेश मोहिते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता शिववंदना घेत झाली .आभार अनंता आगळमे यांनी मानले व सूत्रसंचालन श्याम मालपोटे यांनी केले.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




