वडगाव मावळ:
लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे.उमेदवारांची नावेही जाहीर झाली आहे. मावळ व बारामतीत महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार आहे.याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनाची बैठक घेतली आहे.
मावळ व बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुरूवार दि.४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ .०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक येथे ही बैठक होईल.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.
मावळ व बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची रणनिती आणि नियोजनाची ही बैठक असणार आहे.मावळ मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहे. त्यांची लढत सजोग वाघिरे पाटील यांच्याशी आहे.तर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत आहे.मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे नातेवाईक,सगेसोयरे,मित्र परिवार चिंचवड,पिंपरी,मुळशी,हवेली,खडकवासला या परिसरात अधिक आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व सुनेत्रा पवार यांना निवडणूक आणण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आपले नातेवाईक,मित्र,सगेसोयरे यांना गळ घालतील.गाव पातळीवर सक्षमपणे काम करतील.बुथ निहाय जबाबदा-या दिल्या जातील.यासाठीचे नियोजन या बैठकीत करण्यात येईल असे पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.