नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीम स्किलाचे कार रेसिंग स्पर्धेत यश
तळेगाव स्टेशन:
इंफी लीग मोटरस्पोर्ट्स यांच्या तर्फे राष्ट्रीय स्तरावरील अरावल्ली टेरेन वेहिकल चॅम्पियनशिप (ATVC) सीझन सात या स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. देशभरातील सुमारे एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या मध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
या स्पर्धेमुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी अनुभव घेता आला.या स्पर्धेमध्ये एकूण ६७ संघ सहभागी झाले होते व प्रत्येक संघामध्ये २५ विद्यार्थी होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गाड्या होत्या. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे निर्मिती प्रक्रियेमधील कौशल्य तयार व्हावते, रेसिंग कारमध्ये या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जावे, टीम वर्क आणि साहसीवृत्ती या सर्वांचा मिलाफ होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धा मध्ये नागमोडी वळणे ,तीव्र चढ चढणे , ब्रेक टेस्टिंग, एन्ड्युरन्स सारख्या विविध टेस्ट घेतल्या गेल्या.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीम स्किला ने प्रथमच ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ६७ संघांमध्ये स्किला टीमने सातवा क्रमांक मिळवला. टीम स्किला रेसिंग मध्ये प्रथम ते अंतिम वर्षांमधील २४ विद्यार्थीं सहभागी झाले होते.
टीमचा कॅप्टन अर्शद खान ला बेस्ट कॅप्टन चा अवॉर्ड भेटला. तसेच टीम स्किला ला डिझाईन मूल्यांकनाचा देखील अवॉर्ड प्राप्त झाला. संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, विश्वस्त रामदास काकडे, विश्वस्त महेशभाई शहा,कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी प्राचार्य डॉ. विलास देवतारे, निबंधक विजय शिर्के, यांत्रिकी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश मोरे , प्रा. विशालसिंग राजपूत व सर्व टीम स्किला रेसिंग टीम मेंबर चे अरावल्ली टेरेन वेहिकले चॅम्पियनशिप (ATVC) मधील कामगिरीबद्द्ल हार्दिक अभिनंदन केले.