पुणे:

मावळ लोकसभेची आढावा बैठक काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखा झाली. मावळ लोकसभा मतदार संघासाठी समन्वय समितीची स्थापना काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

या समितीत ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर ,महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ ,सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, युवक अध्यक्ष राजेश वाघोले ,देहूरोड ब्लॉक अध्यक्ष हाजी मलंग मारीमत्तू ,प्रमोद गायकवाड ,दिलीप ढमाले ,राजीव फलके, प्रीतम हिरे, माऊली काळोखे यांची निवड करण्यात आली .

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे करावा व स्वतःला झोकून देऊन वाघेरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष जगताप यांनी केले .

ही निवडणूक लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक असल्याचेही त्यांनी नमूद केले जर ही निवडणूक विरोधक जिंकले तर भविष्यकाळामध्ये निवडणूक होतील का नाही याची खात्री सर्वसामान्य नागरिकाला राहिलेले नाहीये असे त्यांनी आपल्या मनोगत मध्ये भावना व्यक्त केल्या. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल व शिवसेना जिल्हाप्रमुख यांनाही यादी सुपूर्त केली जाईल व लवकरच मावळ लोकसभेमध्ये शिवसेना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे नियोजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.

 यावेळी पुन्हा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक  कौस्तुभ गुजर, खजिनदार बापूसाहेब ढमढेरे, संग्राम मोहोळ उपस्थित होत.

error: Content is protected !!