लोणावळा: मावळातील फार्म हाऊस,होम स्टे आणि टेंटवर चालतेय तरी काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.गुटका,दारू,गांजा,रेव्ह पार्टी अन अश्लील चाळे ,वेश्यागमनाने मावळच्या सुसंस्कृतपणाला काळिमा लागला जातोय. हा सुसंस्कृतपणा सर्वानी मिळून जपला पाहिजे.एखादी घटना मावळच्या सुसंस्कृतपणाचे धिंडवडे काढीत आहे. पाॅर्न व्हिडिओ बनविण्याच्या घटनेने फार्म हाऊस,होम स्टे आणि टेंटवर चालतेय तरी काय?असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 पाटण (ता. मावळ) गावच्या हद्दीतील खाजगी बंगल्यावर पाॅर्न व्हिडिओ काढणाऱ्या महिला पुरुषांवर पोलीसांनी कायद्याचा बडगा उचला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. महिलांसोबत संभोग करून त्याचा व्हिडिओ काढत  अनधिकृतपणे बेबसाईट्सवर अपलोड करत असल्याची माहिती पोलिसांना खब-या मार्फत मिळाली होती. 

या माहितीच्या आधारावर हा बडगा उचलला आहे.या घटनेने मावळातील संस्कृतपणाला गालबोट लागले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.अशा घटना संत विचार आणि पराक्रमाची शौर्यगाथा असणा-या मावळात घडल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. पाटण जवळची ही घटना खब-या मुळे उघडकीस आली.पण मावळात अनेक फार्म हाऊस,स्टे होम, पवना धरण परिसरातील टेंट वर अनधिकृत व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे.बाई आणि बाटलीचा खेळ सर्रास सुरू असलेल्याची कुजबुज सुरू झाली. 

पाॅर्न व्हिडिओ काढण्याची घटना उघडकीस आली म्हणून कारवाई झाली.पण लिव्ह इन रिलेशन किंवा स्वमर्जीने कित्येक जोडपी दिवसाही रात्र रंगवत असल्याच्या चर्चा खुलेआम सुरू झाल्या आहे. लोणावळा,खंडाळा व परिसरातील अलिशान बंगले,आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळातील फार्म हाऊस,टेंट यावर राजरोसपणे  जोडप्यांचा सुळसुळाट वाढला आहे.याला जबाबदार कोण हा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.

व्यवसायातील वाढती स्पर्धा आणि त्यासाठी कमी केलेले कमी दर याचा ही परिणाम होऊ लागला आहे.ऑनलाईन बुकींग मुळे बंगल्यावर कोण येत ,कोण राहते याची माहितीच नसते.त्यातून हे असे प्रकार घडत असल्याचे पोलीसांकडून माहिती मिळाली. 

चार दिवसापूर्वी एका उच्चभ्रू सोसायटीतील जोडपे पवना परिसरात टेंटवर आले होते.या महिलेला आणि तिच्या मित्राला रंगेहाथ तिच्या पतीने पकडले असल्याचे पोलीसांनी खाजगीत सांगितले. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.संबंधित महिलेने मी स्वमर्जीने आले असल्याचे सांगितले. 

अशा घटनेतून आमची पुढची पिढी काय संस्कार घेणार हा खरा प्रश्न आहे.

मावळातील संस्कृती आणि रीतीरिवाज,परंपरा आणि मावळीतील स्वाभिमान जपण्यासाठी पोलिस आणि जनता यांच्या समन्वयातून योग्य दिशेने जाण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!