
नारायणगाव :
लोणावळा ता. मावळ येथील सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार जोरी लिखित ‘ तस्मैश्री… तांबे बाई ‘ या भावस्पर्शी चरित्र कादंबरीचे प्रकाशन नारायणगाव येथे करण्यात आले.
एका आदर्श शिक्षिकेचा जीवनपट आणि जीवनसंघर्ष उलगडणारी ही भावस्पर्शी चरित्र कादंबरी आहे.
खासदार अमोल कोल्हे व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शुभसहस्ते हा प्रकाशन सोहळा झाला.
येथील माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बाबू पाटे संस्थापित राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला.
माजी खासदार आढळराव पाटील, मंगलदास बांदल, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, अनिल मेहेर, पद्मश्री डॉ. मनोहर डोळे, प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तिपरायण डॉ. पंकज महाराज गावडे, विरोबा पतसंस्था अध्यक्ष बाळासाहेब पाटे, सरपंच शुभदा वाव्हळ आदि मान्यवर उपस्थित होते.
गावातील गुणवत्तावान ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतानंतर शिवव्याख्याते नितीन बानगुडे यांचे व्याख्यान झाले.
संस्थापक बाबू पाटे यांनी मनोगतातून आढावा घेत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उपस्थितांची कृतज्ञता व्यक्त केली.
संतोषन खैरे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर औटी, मेहबुब काझी सर व हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




