शकुंतला मराठे यांचे निधन
तळेगाव दाभाडे:
वराळे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील आदर्श माता शकुंतला (ताई) आण्णासाहेब मराठे (वय५८) यांचे रविवारी (दि.२४)अल्पशा आजाराने  निधन झाले.त्या धार्मिक वृत्तीच्या   होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी वराळे येथील इंद्रायणी नदी तीरावरीलवैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
  यावेळी सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी,व्यापार व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या मागे पती, प्रगतिशील शेतकरी आण्णासाहेब मराठे,चार मुले, दीर, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीबानाना मराठे,पुतणे,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. शकुंतलाताई मराठे यांनी आयुष्यभर आपल्या काळ्या आईची सेवा केली. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शेती केली. त्या दानशूर होत्या.मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य
नितीन मराठे, उद्योजक राहुल मराठे, सचिन मराठे, विक्रम मराठे यांच्या त्या मातोश्री तर  माजी राज्यमंत्री संजय तथा बाळाभाऊ भेगडे,  तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती नारायण भेगडे यांच्या त्या भगिनी होत.
दशक्रिया विधी पाचव्या दिवशी गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता वैकुंठधाम इंद्रायणी नदीकाठी, वराळे येथे होणार आहे.

error: Content is protected !!