प्रेक्षकांच्या चर्चेत पुणेकर अभिनेत्री मनाली कांबळे
प्रतिनिधी – श्रावणी कामत
पिंपरी:
चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध व चर्चेत असलेली पुणे येथील पुणेकर अभिनेत्री मनाली कांबळे हिने भरारी घेतली आहे.
खानदेशी भागात पानसो रुपया या गाण्यांमध्ये अतिशय सुंदर अभिनय साकारला..या गाण्याला खानदेशी भागासह महाराष्ट्र,मध्यप्रदेश राज्यात प्रसिद्धीस मोठा वाव आहे.सध्या  जालना, गुजरात, नाशिक, लातूर, सोलापूरात  हे गाणं खूप चर्चेत आहे
  या भागात असलेले अनेक रिल स्टार ही या गाण्यावर रिल्स बनवून आनंद घेत आहे..तर पूर्णतः या गाण्याला विष्णू पावरा या प्रोडक्शन चॅनलला खूप प्रतिसाद मिळाला आहे. आणि कमेंट्सच्या जोरावर मनाली कांबळे यांचे खूप कौतुक होत आहे.
  तसेच हिने मराठी गाण्यांमध्येही चांगले यश मिळवले आहे.. शुभम पावरा प्रोडक्शनला अनुरागी मी तुझा तिच्या या मराठी गाण्यालाही खूप प्रतिसाद मिळाला आहे.. आणि कमेंट्स पाहिल्यानंतर ‌असे लक्षात येते की या मराठी गाण्यांमध्ये तिचे साधी राहणीमान व सोज्वळ दिसंन आणि तिचा सुंदर अभिनय प्रेक्षकांना आवडले आहे.
    गुरुकृपा म्युझिक चैनल प्रोडक्शनला  ‘तुझ्या मध्ये जीव गुंतला ‘ हे तिचे मराठी गाणंही प्रेक्षकांच्या चर्चेत येऊन हे गाणेही प्रेक्षकांना भावूक झाले आहे..नुकतेच चित्रपट प्रसिद्ध क्षेत्रातील शिरूर या परिसरात तृप्ती फिल्म प्रोडक्शन गुंता या फिल्मचे शूटिंग अत्यंत यशस्वी व  उत्साह पूर्ण वातावरणात पार पाडले.
    या फिल्ममध्ये मनाली कांबळे अतिशय उत्कृष्ट सुंदर अभिनय साकारून तिने प्रमुख भूमिका साकारली.. लवकरच गुंता ही ग्रामीण प्रेम कथा शॉर्ट फिल्म तुमच्या भेटीस येत असून.. या फिल्मचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजू भंडारी यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.. या शॉर्ट फिल्म ची शूटिंग पाहण्यासाठी कर्डिले या भागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
     अशा अनेक चित्रपट सृष्टीत क्षेत्रात शॉर्ट फिल्म्स ,ओ टी टी वेब सिरीजमध्ये, अनेक मराठी,खानदेशी गाण्यामध्ये व मॉडेलिंग क्षेत्रात काम  केल्यामुळे व उत्कृष्ट अभिनय साकारल्यामुळे चित्रपट सृष्टीत व तिच्या साधी राहणीमान व सोज्वळ दिसण्याला ती खूप चर्चेत असल्याची खात्री आहे..आणि तिच्या अभिनयाला तोड नाही असं कौतुकास्पद तिचा पुणे या ठिकाणी सत्कार केला गेला.

error: Content is protected !!