वडगाव मावळ:
राज्य हादरून टाकणा-या कोथुर्णेतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल अपेक्षित आहे.या चिमूरडीला न्याय मिळेल आणि नराधमाला शिक्षा मिळेल असा विश्वास मावळ तालुक्यातील तमाम जनतेला आहे.
२ ऑगष्ट २०२२ रोजी या कन्येची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती.राज्य हादरवून टाकणा-या या घटनेनंतर हजारो लेकींनी टाहो फोडला होता.रस्यावर उतरून रणरागिणी कडाडल्या होत्या. स्वराच्या हत्या हृदय पिळवटून टाकणारी घटना होती.
या घटनेने लेकींची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.निषेध आणि मोर्चे निघाले होते.कँडल मार्च काढून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.या घटनेने सारा महाराष्ट्र हादरुन गेला होता.शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंडळे पुढे सरसावली होते.शाळा महाविद्यालयांतून सीसीटीव्ही लावण्यात आले.
२ ऑगस्ट मावळासाठी काळा दिवस होता.या घटनेला उणपुरे दोन वर्ष होत आहे.आज शिवाजीनगर कोर्टात निकाल अपेक्षित आहे.सा-या मावळ करांचे कान निकालाच्या दिशेने लागले आहे. चिमुकलीच्या हत्येचा घटनाक्रम आठवला तरी हृदय पिळवटून जाते.या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवारी दि.२ ऑगष्टला ही हरवल्याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात दिली.पोलिसांची चक्र वेगाने फिरली आणि त्या नराधमाला चोवीस तासात जेरबंद केले.
तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) दुपारी ३.३० च्या सुमारास कामशेतपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत २४ तासांच्या आत आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय २४, रा. कोथुर्णे, ता. मावळ) याला मोठ्या शिताफीने अटक केली.
आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पोक्सो, ३६३, ३०२ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्परपोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्गा श्वानाचा वापर शोध मोहिमेत करण्यात आला. या गुन्ह्याच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, गणेश तावरे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले आदींच्या पथकाने भाग घेतला होता.
तद्नंतर मावळ तालुक्यात गुरुवारी विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.’त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा द्या निषेध मोर्चाप्रसंगी केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी मावळातील जनतेने केली होती.
सबंधित आरोपींचे वकीलपत्र घेणार नसल्याचे मावळ तालुक्यातील सर्व वकील बांधवांनी घोषित केले होते.सर्व राजकीय पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी एकमुखी या अंदोलनात सहभाग घेतला होता.स्थानिक पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरले होते.आज तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!