तुंगार्ली येथील प्रसाद  इंगुळकर यांची ग्राममहसूल अधिकारीपदी निवड
कार्ला:
  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेत तुंगार्ली गावातील युवक चि.प्रसाद शंकरराव इंगुळकर यांची ग्राम महसूल अधिकारी म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झाली आहे.
  या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लहानपणापासून असणारी अभ्यासाची आवड , जिद्द , चिकाटी व अभ्यासाचे योग्य नियोजन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.घरची परीस्थिती हलाखीची असताना केवळ अभ्यासातील सातत्य यामुळे यशाला गवसणी घालण्यात आली असे मत प्रसादने व्यक्त केले.
प्रसादचे वडील हे खंडाळा येथील अंधवृद्धाश्रम येथून सेवानिवृत्त झाले आहे तर आई कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिलाईचे काम करते.यापुर्वी प्रसादचा बंधू विकास यांची देखील स्पर्धा परीक्षेतून भारतीय रेल्वे विभागात निवड झाली आहे.
एकाच घरातील दोन जणांची स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड होण्याचे हे तुंगार्ली गावातील एकमेव उदाहरण आहे.प्रसादने व विकासने आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षकबंधू कार्ला एकवीरा विद्या मंदिराचे शिक्षक उमेश इंगुळकर व कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले आहे.

error: Content is protected !!