कोथुर्णेतील कांचनच्या कष्टाची प्रेरणादायी यशोगाथा
पवनानगर
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील कुमारी कांचन लक्ष्मण दळवी वडीलांच्या निधनानंतर भावाच्या मदतीला धावून आली आहे.कांचन हिचे शिक्षण बारावी पर्यंत असून तिचे वय आता २१ वर्ष पूर्ण झाले आहे.
पंरतु वडिलांच्या निधनानंतर वयाच्या आठ वर्षाची असताना चिकाटी व जिद्दीच्या जोरावर एखाद्या मुलाच्या बरोबरीने ती रोज सकाळी लवकर उठून परिसरातील शेतकऱ्यांचे दुग्ध जमा करुन पुणे येथे विक्री साठी संकलन करत आहे. वडिलांची तुटपुंज्या बागायत शेती सभाळत आई घरकाम व शेती तर भाऊ एका खाजगी दुधडेअरी मध्ये काम करत होता.पंरतु त्यामधुन मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून घर सभाळंणे कठीण झाले होते.
भावाचे दुख पाहुन भावाच्या मदतीला कांचन ने इयत्ता बारावी मध्ये शिक्षण थांबवून भावाने गावातच सुरु केलेल्या दुध डेअरी वर काम करु लागली त्यामधुन मिळणाऱ्या पैशाने घरातील अर्थिक अडचण दुर करुन एका दुध डेअरी कोथुर्णे गावात तर दुसरी पवनानगर बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केला आहे.
यामध्ये पवनानगर येथे भाऊ तर कोथुर्णे गावामध्ये दुध संकलन करत असतात.रोज सुमारे पाचशे ते सहाशे लिटर दुध पवनमावळ भागातील शेतकऱ्यांचे दुध संकलन करत असुन ते पुणे येथे विक्री साठी घेऊन जात आहे.
यावेळी कांचन दळवी हिने सांगितले कि ,”व्यावसायाची आवड अशी जिद्द मनात होती. वयाच्या ८ वर्षाची असताना मला स्वताच्या जिद्दीवर काहीतरी करावे.भावाने संपूर्ण घराची जबाबदारी घेत लहानाचे मोठे केले. आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने मला व माझ्या बहिणीचा उच्च शिक्षण घेता आले नाही.
व्यावसाय करण्याची संकल्पना मनात आली. आणि दुग्धव्यावसाय करण्याचे ठरवले. भावाने मला ५ वर्षांपूर्वी दुध डेअरी व्यवसाय सुरु करण्यासाठी भावाने मला बँकेतून कर्ज घेऊन दिले.दुध डेअरी टाकण्यासाठी मदत केली.याचा फायदा जवळपासच्या गावक-यांना होतो.त्यांना दूध विक्री साठी लांब जावे लागत होते.५ वर्षाच्या विश्वासामुळे आज सद्‌गुरू दुध डेअरी व्यावसाय वाढत आहे.

error: Content is protected !!