टाकवे बुद्रुक येथील जि.प. प्राथमिक शाळेत  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील जि.प. प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे विज्ञान, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक वाढविण्या‌साठी हा दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, सरपंच सुवर्णा असवले व केंद्रप्रमुख सुभाष बुरकुले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश काटकर ,उर्मिला दीपक शिंदे, माजी अध्यक्ष अनिल असवले, विकास असवले, सदस्य राजेंद्र लंके, श्रीकांत मोढवे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवीच्या विध्यार्थ्यांनी सह‌भाग घेतला. विविध विषय व घटकांवर आधारित प्रयोगांचे आयोजन फुफूस कार्य, भुकंप,डोअर बेल, मानवी शरीररचना, चांद्रयान 3,पावसाच्या पाण्याची साठवणूक व वापर, मिरची कांडप यंत्र, सूर्यमाला या सारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
यावेळी गावातील अनेक नागरिकांनी व पालकांनी या ठिकाणी भेटी देऊन प्रयोग कशा पद्धतीने साकारले व त्या प्रयोगाची माहिती घेत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना व पालकांना व्यवस्थित रित्या प्रयोगाची माहिती व फायदे सांगितले.
तसेच परिसरातील इतर शाळांनी प्रदर्शनाला भेट दिली त्यामध्ये प्रामुख्याने जि.प.शाळा वाघमारेवाडी, फळणे, बेलज या शाळेतील विद्याथ्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांसह विविध प्रयोगाची माहिती घेऊन या प्रदर्शनाला प्रदर्शला भेट दिली.
या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मुख्याध्यापिका वंदना असवले, अध्यक्ष संदीप मालपोटे,उपाध्यक्ष गणेश काटकर,सदस्य व सर्व वर्गशिक्षकांनी केले.

error: Content is protected !!