इंदोरी:
ॐ सूर्याय नमः.. असा मंत्रोच्चार इंदोरीच्या चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित, चैतन्य इंटरनेशनल स्कूल येथे घुमला.निमित्त होते रथसप्तमी पासून सुरू झालेल्या १०८ सूर्यनमस्कार संकल्प सोहळा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. शाळेतील विद्यार्थांना व्यायामाची गोडी वाढावी.
बलदंड शरीरसंपदा कमवावी याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला.
सर्व विद्यार्थी आवडीने या उपक्रमात सहभागी झाले होते.रथसप्तमीचे महत्व अधोरेखित आहे.याच दिवसाचे औचित्य साधून शाळेने हा उपक्रम अतिशय सुरेख पद्धतीने राबविला.
प्रत्येक दिवशी सर्व मुलांनी सूर्य मंत्राचा उच्चार करून सूर्य नमस्कार घातले.सूर्यनामस्कार सोबत रोप मल्लखांब देखील केले.गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, पसायदान आणि मेडिटेशनने शाळेच्या प्रांगणातील वातावरण भक्तिमय झाले होते. संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांनी  सर्व मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर म्हणाले,” सूर्य नमस्कार आपल्या जीवनातील दैनंदिनीचा भाग असावा.सूर्य नमस्कार केल्याने शरीर बलदंड होतेच.शिवाय मनाची एकाग्रता वाढते.विद्यार्थी अनुकरणप्रिय आहे.सूर्यनमस्कार सारख्या संस्कारक्षम उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला याचे समाधान आहे.

error: Content is protected !!