राजेवाडीत स्वराज्य प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहात
राजेवाडी :
दिवडच्या राजेवाडीत स्वराज्य प्रतिष्ठानची शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
भरत राजिवडेअध्यक्ष.रा.काॅ.पा.मावळ तालुका संस्कृतीक विभाग,गणेश राजिवडे सरपंच,शिवव्याख्याते शिवभक्त विक्रांत शेळके,संतोष राजिवडे अध्यक्ष भा.ज.पा.दिव्यंग सेल मावळ,ज्योतीताई भरत राजिवडे अध्यक्ष.रा.काॅ.दिव्यंग सेल तळेगाव शहर,महेंद्र राजिवडे , मनोहर सावळे, देवदास सावळे, स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष अजय सावळे,उपाध्यक्ष.सागर राजिवडे ,खजिनदार प्रविण राजिवडे ,सचिव ॲड.राहुल राजिवडे ,कार्याध्यक्ष अमर राजिवडे उपस्थितीत होते.
रांगोळी स्पर्धेतील विजेत्या सलोनी दत्ता राजीवडे,श्रेयस अनिल सावळे,अक्षदा प्रवीण राजीवडे,शितल तानाजी,आरोही महेंद्र राजीवडे यांना गौरविण्यात आले.
व्याख्यानकार शिवभक्त प्रा. विक्रांत शेळके यांनी स्पर्धेंचे परिक्षण केले.किल्ले शिवनेरी ते राजेवाडी दिवड अशी शिवज्योत आणली.श्रींची मिरवणूक काढण्यात आली.महिला पुरुषांनी पारंपारिक वेषभूषा परिधान केल्या होत्या.