पिंपरी:
देहूगाव येथील वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन  केंद्राला मदतीचा हात मिळावा यासाठी पैसे नको रद्दी द्या असे आवाहन उपक्रम प्रमुख किशोर अण्णासाहेब थोरात आणि आधार शैक्षणिक संस्था व रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगराच्या अन्य भागातील नागरिक मदतीचा हा हात देऊ शकतात.सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,पुणे  ,आधार शैक्षणिक संस्था पुणे,रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट आणि Excellent International School, Jadhavwadi यांच्या संयुक्त विद्यामानाने, वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन (देहूगाव) केंद्राला मदतीचा हात मिळावा यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.
तुम्ही  घर , कंपनी , ऑफिस , शाळा , कॉलेजमधील, रद्दी  देऊन छोटीशी मदत करू शकता.रद्दी ही वही,पुस्तक किंवा न्युजपेपर ची असू शकते.या छोट्या मदतीमधून तेथील मुले आपल्या दिलेल्या रद्दी पासून वस्तू बनवून,विक्री करून त्यातून त्यांच्या आश्रमाचा खर्च भागवणार आहेत.
किशोर थोरात म्हणाले,” आपण या स्तुत्य अशा उपक्रमात भाग घेऊन आम्हाला साथ द्यावी.यासाठी आपणास आपले नाव व पत्ता(थोडक्यात) द्यावा लागेल व रद्दी काय ,किती आहे ते सांगावे लागेल.त्या त्या परिसरातील  प्रतिनिधींना आपण संपर्क करू शकता.
मदतीसाठी खालील क्रमांकावर  व्हाट्स अँप करावे
चिंचवड पूर्व- किशोर थोरात 8796824682,महेंद्र शेळके
9657714171,मोशी, चिखली,भगवान वायकर 9850963257, राहुल गवळी 7030145005,पिंपरी चिंचवड पश्चिम महेंद्र पाटील(काळेवाडी)
8805928902,आशिष सेनापती(काळेवाडी)
9822354871 ,सिंहगड रोड सदाशिव थोरात
9373372213,लोहगाव,धानोरी, विश्रांतवाडी,संदीप कांबळे
  9049485501 ,आदिनाथ शिंदे 9049257835,चंदन नगर,नगर रोड,प्रकाश रसाळ 7350052538, सलमान शहा 9146102560,शिरूर नगर रोड गणेश लंघे
9561556322,चाकण गोकुळ महाले 9850173773,उपक्रम प्रमुख किशोर अण्णासाहेब थोरात
8796824682,पुणे जिल्हा अध्यक्ष.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ अशोक दगडू शिंदे
9960205843अध्यक्ष आधार शैक्षणिक संस्था,पुणे,
अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट
संस्थेबरोबर अशा अनेक उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण संपर्क करू शकता असेही आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!