कवीचे अंतरंग अथांग : पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी :
“कवीचे अंतरंग अथांग असते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी राजवाडा लॉन्स, काळेवाडी, पिंपरी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित ‘अंतरीच्या खोल डोही’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, कवयित्री शोभा जोशी, प्रा. डॉ. धनंजय भिसे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
कवयित्री प्रज्ञा घोडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. सविता इंगळे यांनी त्यांचे मनोगत वाचून दाखवले. त्यामध्ये, “‘अंतरीच्या खोल डोही’ हा माझा प्रकाशित झालेला सहावा कवितासंग्रह असला तरी अजूनही मी काव्यशारदेच्या दरबारातील विद्यार्थी आहे अन् माझी शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. काव्यलेखनासाठी माहेरी आईकडून प्रेरणा मिळाली आणि आता नातवंडांसह संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. वर्षा बालगोपाल यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

error: Content is protected !!