स्पार्क मिंडा फाउंडेशन करणार दिव्यांग बांधवांना सक्षम
तळेगाव दाभाडे :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्पार्क मिंडा फाऊंडेशन मार्फत ‘दिव्यांग सशक्तिकरण ‘ उपक्रमात ७०   दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करण्यात आली. व आवश्यकतेनुसार कृत्रिम साहित्याचे मोजमाप घेण्यात आले.
मावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना या साहित्याच वाटप दि.24/2/2024 रोजी करण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगानेच दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष गुट्टे , स्पार्क मिंडा फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी निलेश पवळे, दिनेश पाटील, प्रहार अपंग क्रांती संस्था मावळ तालुकाचे अध्यक्ष संदिप भोसलकर, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चे सदस्य तानाजी मराठे,   रा.काॅ.दिव्यंग सेल तळेगाव शहर अध्यक्षा ज्योती भरत राजिवडे, विकास लिंबोरे तसेच अर्चना  नाटेकर,किशोर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी एकूण ७० दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम साहित्याचे मोजमाप घेण्यात आले. तसेच  प्रवासाच्या अडचणी अभावी येऊ न शकलेल्या ११० बांधवांची फोनद्वारे नोंद करण्यात आली. तसेच ज्यांना साहित्याची आवश्यकता आहेत्यांनी  तानाजी मराठे,  संदिप भोसलकर व ज्योती राजिवडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. दिनांक २४ फेब्रुवारी रोजी साहित्य वाटप दरम्यान सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था स्पार्क मिंडा फाऊंडेशन मार्फत करण्यात आली आहे.

error: Content is protected !!