सद्गुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त  महा जपयज्ञ
पुणे:
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे थोर समाज सुधारक तत्वज्ञ सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवन विद्या मिशनने घरोघरी विश्वप्रार्थना या दिव्य उपग्रहाचा संकल्प केला आहे.
दिव्य सकारात्मक शुभ विचारांच्या विश्वप्रार्थनेची जागोजागी घरोघरी पेरणी व्हावी आणि दिव्य सुंदर विचारांच्या लहरी सर्वत्र पसराव्यात हा या उपक्रमाचा शुद्ध हेतू आहे
सद्गुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त 11 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता एस. पी. कॉलेज मैदान टिळक रोड पुणे येथे भव्य व दिव्य विश्व प्रार्थना महा जप यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपण सहभागी होऊनअगणित पुण्याची प्राप्ती तसेच आपणास सहज समाज उपयोगी दिव्य कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे.
“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.”
सर्वांचे भले व्हावे या दिव्य सकारात्मक शुभ विचारांच्या विश्वप्रार्थनेने आपल्या जीवनात सुख शांती यश समाधान आणि स्थेर्य लाभेल अशा या दिव्य उपक्रमात  लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून जीवनाचे सोने करावे.

error: Content is protected !!