देहू:
जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या विशेष सहकार्याने अभंग प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  अभंग प्रतिष्ठान गेल्या वीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमातून लोकसेवेचे कार्य करीत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १४ वर्षे सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे.
  श्री.संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे. रक्तदान शिबिर वैकुंठ मंदिरासमोर, गोपाळपूरा येथे संपन्न होणार आहे.
   आपण रस्त्यावरून जाताना सर्व वाहतुकीचे नियम पाळावे व स्वतःची काळजी घ्यावी हा संदेश ही भेट देण्यामागे आहे. याशिवाय आजही रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
   अशावेळी गरजु व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक रक्तगटाचे रक्त मिळवण्यासाठी अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यामुळेच प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून संत तुकाराम महाराजांच्या अभंग वचनाप्रमाणे सेवा कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
या उपक्रमास प्रामुख्याने तरुणांचा अतिशय उत्कृष्टपणे सहभाग कायम लाभत असतो. अशी माहिती अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष महादू भसे,उपाध्यक्ष,वैभव बाळासाहेब काळोखे, सोमनाथ प्रल्हाद जगताप व खजिनदार सुजित बाळकृष्ण मोरे यांनी दिली.

error: Content is protected !!