सोमाटणे:
अंतरवली सराटी ते मुंबई मोर्चातील मोर्चेकर्‍यांसाठी पुणेतील रेड स्वस्तिक सोसायटी  तर्फे सोमाटणे फाटा येथे  वैद्यकीय तपासणी व औषध वाटप करण्यात आले.
गेली २३ वर्ष मानवतेचा वसा जपणाऱ्या व एक आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवेत अथक कार्यरत असलेल्या रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन व पवना हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमाटणे फाटा येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या मोर्चेकरांच्या आरोग्याची मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्य तपासणी व  औषध वाटप सेवा रात्री साडेबारा वाजेपर्यंत अथक सुरू होती.
या शिबिराच्या नियोजनात रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक सुरेश कोते , रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव तथा सहमहाव्यवस्थापक व शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष  अशोकराव शिंदे, रेड स्वस्तिक सोसायटी पुणे जिल्हा अध्यक्ष  संतोष बारणे यांचे तसेच इतर जिल्हा पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबिराचे नियोजन  सचिन शिवाजी भामरे,रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव तथा संघटक छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र कमलेश राक्षे, रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा खजिनदार तथा पदाधिकारी छत्रपती शिवाजी ब्रिगेड तथा संस्थापक महानराष्ट्र फाउंडेशन साळुंब्रे यांनी केले.
शिबिराच्या नियोजनात अजय जोगदंड (नि.वरिष्ठ पोलीस निरीक्षक), नंदू रायगडे, सुहास हगवणे, गुलाब दगडे, दिनेश येनपुरे, प्रतीक जाधव  या रेड स्वस्तिक सोसायटी पुणे व छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम  घेतले .
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच व  मान्यवर सदस्य ग्रामपंचायत साळुंब्रे, सरपंच व मान्यवर सदस्य ग्रामपंचायत सोमाटणे व अनेक समाज बांधवांची उपस्थिती व सहकार्य प्राप्त झाले. एक आरोग्य अभियान या घोषवाक्याला साजेसे असे बंधुता मानवता जपणारे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम यापुढे राबवले जाण्याकरिता साळुंब्रे, सोमाटणे तसेच पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींनी रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया बरोबर काम करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!