तळेगाव दाभाडे :
येथील माजी नगरसेवक गोपाळ दगडू परदेशी(वय ५४) यांचे रविवार (ता. २८)ला  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.राजकारण,समाजकारण व पत्रकारिता यात ते सक्रीय असायचे.
सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून त्यांची निघणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ते माजी नगरसेवक, आवाज न्युजचे संपादक, दुर्गामाता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून तळेगाव दाभाडे येथील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. नेहमीच हसमुख स्वभाव असणार गोपाल परदेश सदैव समाजातील विविध उपक्रमात आवर्जून सहभागी होत. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!