इंदोरी:
चैतन्य फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनेशनल स्कूल (CBSE), येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्स्फूर्तपणे साज़रा करण्यात आला.प्रमुख पाहुणे रोहित चाफेकर आणि संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.
इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट परेड सादर केली.गणेश वंदना आणि एक देश प्रेमा वर आधारित गण्यांवर समूह नृत्य सादरिकरण झाले. रोहित चाफेकर यांनी प्रजासत्ताक दिनापरित्यर्थ मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष शेवकर  म्हणाले,” प्रत्येक शिक्षण संस्थेवर विद्यार्थ्यांची भावी पिढी  घड़वायची जवाबदारी आहे. यासाठी आम्ही कटिबद्ध व प्रयत्नशील आहोत. पालकांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहयोग आणि संस्थे वर असलेल्या विश्वासा मुळे हे असंभव वाटणारं कार्य सहजपणे होवून जाते.

error: Content is protected !!