सोमाटणे:
शिवणे सडवली ग्रामपंचायत हद्दीत श्रीक्षेत्र अयोध्या येथे  श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव निमित्त  सोमवार दि. २२/०९/२०२४ रोजी गावात कोणत्याही प्रकारचे मटन, चिकन, मच्छी, चायनीज तसेच देशी विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यासाठी बंदी केली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात या आशयाचा ठराव मांडण्यात आला आहे.ग्रामपंचायतीने  मटन, चिकन, मच्छी विक्री दुकाने, चायनीज काने, मांसाहारी हॉटेल अथवा ढाबा मद्य (दारू) दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरु न ठेवता संपूर्ण बंद ठेवावी,अशा सुचना दिल्या आहे.
सर्व विक्रेत्यांनी दुकान धारकांनी ह्या सूचनेची दाखल घेऊन श्री राम उत्सव व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सरपंच महेंद्र वाळुंज,उपसरपंच कविता शेटे, ग्रामपंचायत सदस्य संगीता गायकवाड, अविनाश डिसले व सर्व सदस्य व ग्रामस्थ मध्ये चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

error: Content is protected !!