
वडगाव मावळ:
मकरसंक्रांतीच्या सणाला नातेवाईक,मित्रमंडळी यांना चुलीवर बनवलेली वाफुळीची मेजवानी देऊन ग्रामीण भागात नात्यातला गोडवा जपला जात आहे.
मकरसंक्रांतीच्या सणाला मावळ च्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जात असते. यामध्ये मावळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घरोघरी महिला आपल्या घरातील सर्व वयोवृद्ध,सुना,मुली,महिला एकत्रित येऊन चुलीवरच्या उकळत्या पाण्याच्या वाफेवर तयार केलेली वाफुळी केले जाते. यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी यांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने खाण्यासाठी बोलवले जाते व नातेवाईक व मित्रमंडळी यांना मोठ्या आंनदाने घरोघरी जाऊन दिली जाते.ग्रामीण भागातील नातेवाईक एकमेकांना मोठ्या आंनदाने वाफुळी दिले जाते.
विशेषत: मकरसंक्रांतीच्या दिवशी मावळ तालुक्यातील पश्चिम ग्रामीण भागातील महिला सकाळी पहाटे लवकर उठून नवीन वर्षातील पहिल्या सणाचे मोठ्या उत्साहात सण साजरा करत असतात त्याच बरोबर सकाळी उठून कोळंबा जातीचे तांदूळ भिजत घालून त्याची वाळवणी करतात.
वाळवल्यानंतर दुपारी त्या तांदळाचे जात्यावर दळण करुन करुन मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे चुलीवर दळून राहिलेला मोठा तांदूळ शिजवून घ्यायचा.नंतर ते एक ते दोन तास थंड करायचा.व त्यामध्ये मैथी,धने,बडिशेप,व हरभारा डाळ,सुट,विलायची,काजू,खोबऱ्याचा किस व शेंगदाण्याचा कुंट अशा सर्वाचे पदार्थांचे एकत्रित मिश्रण करुन चुलीवर तेल व हिंग यांची फोहणी देऊन काही वेळ एका बंद डब्यात भरुन ठेवायचे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी चुलीवर एका ताटामध्ये सर्व मिश्रण केलेले पदार्थ घेऊन चुलीवर उकळत्या पाण्यामध्ये वाफेवर शिजवला जातो. यानंतर वाफुळी तयार होते.
मकरसंक्रांतीच्या नंतर आठवडा भर हे वाफुळी आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना खाण्यासाठी घरोघरी बोलवले जाते.वाफुळी मावळच्या पश्चिम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मकरसंक्रांतीच्या सणाला आवर्जून केले जाते यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊन एकत्रितपणे येऊन याचा स्वांद घेतला जातो व एकमेकांची मोठ्या आंनदाने विचारपूस केली जात असते.हि पंरपरा मावळ भागातील पश्चिम व इतर काही भागांत पुर्वीजा पासुन केली जात असल्याचे मत संगीता देवशंकर गाडे यांनी सांगितले आहे.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




