महाराष्ट्र शासनच्या पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत भट यांची रुडसेट संस्थेला सदिच्छा भेट
तळेगाव स्टेशन:
रुडसेट संस्था, तळेगाव दाभाडे येथे पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे यांचे उपायुक्त डॉ. प्रशांत भट यांनी संस्थेत सुरू असलेला शेळी मेंढी पालन या मोफत, निवासी, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन पशुसंवर्धन विभागा मार्फत चालू असलेल्या पशूधन या बद्दल महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध योजना बद्दल माहिती दिली.
भारत सरकारच्या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन (राष्ट्रीय पशुधन अभियान)अंतर्गत 1 कोटी रुपयांची शेळी मेंढी पालन, पौल्टी, दुग्ध, वराह पालन या सारख्या योजनाची सविस्तर माहिती सांगून या योजने मध्ये 50 टक्के अनुदान देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या साठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे मार्गदर्शन केले.
या वेळी सुरू असलेल्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करून एक आदर्श पशू पालक म्हणून मोठ्या योजनेचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हा म्हणून शुभेच्या दिल्या.
सुरू असलेले शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रम बद्दल समाधान व्यक्त करून संस्था शेती पूरक व्यवसायासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करत असून शेती बरोबरच अजून शाश्वत उत्पन्नाची हमी प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना मिळत आहे म्हणून संस्थेच्या कार्यात पशुसंवर्धन विभाग कायम संस्थे बरोबर आहे असे सांगून संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.संस्थेच्या वतीने त्यांना पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
- MPL – 2025 मावळ प्रिमियर लीगचे इंदोरीत दिमाखदार उद्घाटन
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती
- कडजाई माता क्रिकेट मैदानाची आयोजक प्रशांत भागवत यांच्या कडून पाहणी