मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव मावळ:
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहर मर्यादित भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात शहरातील लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सुमारे 1200 ते 1300 पतंग प्रेमी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पतंग प्रेमींना मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने पतंग आणि दोऱ्याचे रीळ विनामूल्य वाटप करण्यात आले. यात लहान मुले-मुली, युवक तसेच पालकांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
यावेळी काॅंग्रेसचे मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सुभाषराव जाधव, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, अरूण चव्हाण, मा उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, मा सभापती गुलाब म्हाळसकर, श्रीधर ढोरे, बारकूनाना ढोरे, शांताराम कुडे, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, मा नगरसेवक राहुल ढोरे, किरण म्हाळसकर, प्रविण चव्हाण, पूनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले, शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल वायकर, मा उपसरपंच विशाल वहिले, रा काॅं अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मजहर सय्यद, उद्योजक सचिन कडू, राजेश ढोरे, समीर दौंडे, रविंद्र काकडे, विनायक भेगडे पुणे काईट्स चे प्रमुख रमेश पारते, श्रीकांत चेपे आणि वडगाव शहरातील हजारों पतंगप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी, मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी संचालिका, मोरया प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि शहरातील लहान मुले-मुली, नागरिक, मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मकरसंक्रांत निमित्ताने घेण्यात आलेल्या या पतंग महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पतंग प्रत्यक्षात उडवण्याची तसेच पाहण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीच लहान मुलांना तसेच पालकांना अनुभवायला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. या पतंग महोत्सवातील मोठ्या पतंगावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, माझी वसुंधरा यांच्या प्रतिकृतीचे पतंग आकाशात झेपावल्याने लहानासह नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत येत्या कालावधीतही वडगाव शहरातील नागरिकांसाठी अशाच सामाजिक, सांस्कृतिक, कला मनोरंजन आणि अत्यावश्यक अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती  मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.

error: Content is protected !!