सण साजरे करा पण
पर्यावरणाचे भान राखूनच
नायलॉन , चायनीज मांजा वापरा सबंधी संस्थेने दिले निवेदन
पुणे:
दरवर्षी मकर  संक्रांती दरम्यान पतंग उडविण्याचा सिझन सुरू होतो. परंतु बंदी असून देखील नायलॉन चायनीज, घातक अशा  मांजाच्या अतिवापरामुळे अनेक नागरिक तसेच मुक्या  निरपराध  जीवांवर हे बेतत आहे.
महा एन जीओ फेडरेशन, टेलस ऑर्गायझेशन आणि जाणीव जागृती संस्थेचे कार्यकर्ते  दरवर्षी मकर संक्रांती नंतर काही पोती  भरून मांजा, पतंग झाडावरून, मैदानातून, डोंगरातून  अन्य भागातून सोडविण्याची कामे करीत असतात.
तर जखमी मुक्या पक्षी प्राण्यास  यातून सोडवून जीवदान देण्याचे कामे करीत आहेत. असे ही नायलॉन मांजावर बंदी असून देखील वापरले जाणारे चिनी मांजे  अजून किती नागरिकांचा तसेच मुक्या जिवाच्या जीवावर बेतणार आहेत . या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत मुकुंद शिंदे संचालक महा एनजीओ फेडरेशन,लोकेश बापट अध्यक्ष टेलस ऑर्गायझेशन तसेच ईश्वर कसबे अध्यक्ष जाणीव जागृती यांनी पुढाकार घेत  महापालिका उपायुक्त पर्यावरण विभाग माधव जगताप यांना कार्यालयात या बाबत निवेदन दिले.
परंतु शहरात नायलॉन आणि चिनी मांजाचा सरार्स वापर चालूच आहे याकडे प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहील का अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

error: Content is protected !!