मोरया प्रतिष्ठान माध्यमातून वडगाव शहरातील दोन कुटुंबांतील नागरिकांना व्हील चेअरचे वाटप
वडगाव मावळ:
नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत “हे गाव माझं आहे आणि मी त्याचं काही देणं लागते”… या उदात्त भावनेने “मदत नव्हे कर्तव्य” अंतर्गत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या वतीने मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरामधील चव्हाणनगर येथील एका कुटुंबातील ४० वर्षीय बांधवांला अचानक उद्भवलेल्या आजारामुळे चालणेही शक्य होत नसल्याने तसेच शहरातील दत्तनगरी परिसरातील अजून एका कुटुंबातील जेष्ठ नागरिक असलेल्या ८३ वर्षीय दिव्यांग जेष्ठ नागरिकाला मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी या व्यक्तींच्या निवासस्थानी जाऊन प्रत्येकी एक एक व्हिलचेअर भेट दिल्या.
गेल्या तीन वर्षांपूर्वी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील गरजू नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालयात मोरया जनआरोग्य सेवा मदत कक्षाची स्थापना केली. या मदत कक्षाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन व अत्यावश्यक उपचारासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य केले जाते. मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत वडगाव मधील सुमारे तीनशेहून अधिक रुग्णांवर ह्दयातील छिद्र, कॅन्सर, मणका, मोतीबिंदू, कान, नाक, घसा, हात , पाय, जीभ, वाहन अपघात अशा अनेक आजारांवरील छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया पुणे, मुंबई, पिपंरी, चिंचवड, वडगाव येथील विविध हाॅस्पिटल मध्ये अतिशय अल्पदरात तसेच अगदी मोफतही पार पडल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या आरोग्य शिबीरातून दिव्यांग बांधवांना विशेष सहकार्य विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप केले जाते.
सर्वसामान्य जनतेच्या मनात मोरया प्रतिष्ठान ने निर्माण केलेले आपुलकीचे स्थान कधीही कमी पडू न देता पुढील काळात देखील माणुसकीचा हा धागा कधीच सुटणार नाही. असा विश्वास देऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी या दोनही कुटुंबाना आश्वासित केले. यावेळी मोरया जन आरोग्य सेवा मदत कक्ष प्रमुख सुरेखा गुरव, यशवंत शिंदे, प्रसाद साबळे आणि या दोनही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!