सुदूंबरे:
येथे श्री.संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार, दि. ९ जानेवारीला  सकाळी ११ वा. श्रीक्षेत्र सुदूंबरेत महापूजा व अभिषेक  सकाळी ७ ते ९ या वेळेत उत्सव अध्यक्ष सौरव सुर्यकांत भागवत यांच्या हस्ते होईल. उद्‌घाटक सौरम संजय रत्नपारखी यांच्या हस्ते होईल.
फुलांचे किर्तन ह.भ.प. रामदास नाना महाराज मोरे यांचे  सकाळी १० ते १२ या वेळेत होईल.मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.भाविकांना  महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. विजय रत्नपारखी (कार्याध्यक्ष), सौरभ रत्नपारखी (उत्सव उद्घाटक), प्रशांत भागवत (चिटणीस)
सौरभ भागवत (उत्सव अध्यक्ष) आहेत.श्री.संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, श्रीक्षेत्र सुदुंबरे ग्रामस्थ, समस्त रत्नपारखी आणि भागवत परिवार कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!