साते मावळ :
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अक्षतांची मंगल कलश दर्शन मावळ मधील ऐतिहासिक साते येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजन   करण्यात आले.
‘जय श्रीराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.जय श्री रामचा जयघोष करीत  श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या जन्म गावी साते येथे गावातील पालखी मार्गावरून मंगल अक्षता कलशाची पालखी मधुन मिरवणूक काढण्यात आली. लहान मुले शिस्तबध्द दुतर्फा रांगा करुन भगवी पताका हाती धरून राम कृष्ण हरी म्हणत सर्वांच्या पुढे होती .यात्रेमध्ये गावातील युवक, युवती, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला वर्गानी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून स्वागत केले तसेच जागोजागी कलश चे पूजन केले. श्री भैरवनाथ महाराज भजन मंडळ ने भजनाची छान साथ दिली. पालखी मिरवणूक शेवटी श्री हनुमान मंदिर येथे विसावली. आरती घेवुन सर्वांना प्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.

error: Content is protected !!