महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
पिंपरी :
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील शिवाजीराव अ. शिर्के यांनी महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथ लिहून ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित केला. या ऐतिहासिक पुस्तकाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. यामुळे महासम्राज्ञी येसूबाई साहेब ग्रंथास ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ चे गोल्ड मिडल व पारितोषिक प्राप्त झाले आहे.
शिवाजीराव अ. शिर्के यांनी विविध ऐतिहासिक ग्रंथाचा अभ्यास करून धर्मवीर संभाजीराजे भोसले यांची धर्मपत्नी महाराणी येसूबाई साहेब यांच्या संघर्षमय जीवनावर हा ग्रंथ लिहिला आहे. शिवाजीराव यांचे वय ७९ वर्षाचे असून त्यांनी या वयातही पुस्तक लिहून हा आदर्श निर्माण केला आहे.
‘शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा’, ‘कुटुंब लहान सुख महान’, ‘पराचा कावळा’, ‘पसरणी गावच्या काळभैरवनाथाचे महात्म्य’, ‘पसरणी गावची गौरवगाथा’, ‘गरूड भरारी’- सातारच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची’, ही पुस्तके लिहिली आहेत.’ पुरस्कार’, ‘ही पैशाची किमया सारी’, या लघुनाटिका लिहिल्या आहेत.
‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे (आत्मचरित्र) तसेच ‘राजेशिर्के घराण्याचा कुलवृत्तांत’,’ शिरकाण’, ही ऐतिहासिक पुस्तके लिहिली आहेत. आणि आता ‘महासम्राज्ञी येसूबाई साहेब’ या ऐतिहासिक ग्रंथाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. या संस्थेने गोल्ड मिडल व सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. महासम्राज्ञी येसूबाई साहेब या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी नोंद करून गौरव केल्याने पुणे, पिंपरी, चिंचवड, औद्योगिक नगरीतील कामगार, कवी, साहित्यिक, पत्रकार यांच्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान