कार्ला:
श्री एकविरा विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
श्री एकविरा विद्यालयात नवोदय हस्तलिखीताचे प्रकाशन
कार्ला- नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॕलेजचे वार्षिक पारितोषिक व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरवात माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे यांंच्या हस्ते ध्वजारोहण करुन झाली.
यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन सचिव संतोष खांडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशभाई शहा,माजी सभापती शरद हुलावळे ,माजी प सदस्य दिपक हुलावळे,शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे, संचालक दामोदर शिंदे,शंकर नारखडे,ग्रा सदस्या वत्सला हुलावळे,भारती मोरे,सोनाली मोरे,उज्वला गायकवाड प्राचार्य संजय वंजारे,पो पाटील संजय जाधव,काशिनाथ निंबळे,भाऊसाहेब आगळमे,कैलास पारधी,वासंती काळोखे,सविता चव्हाण,अनंता शिंदे,नितिन वाडेकर,तुकाराम हुलावळे यांंच्या हस्ते करण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत तयार करण्यात आलेल्या विज्ञान दालनाचे उदघाटन माजी सभापती शरद हुलावळे,रांगोळी दालनाचे उदघाटन सरपंच दिपाली हुलावळे ,कला दालनाचे उदघाटन उपसरपंच किरण हुलावळे यांंच्याहस्ते झाल्यानंतर दरवर्षी विद्यार्थांंच्या कला गुणांना वाव मिळावा हेतूने तयार करण्यात आलेले ‘नवोदय’ हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेच्या वतिने देण्यात येणारे हुतात्मा क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे पुरस्कार मिळवलेल्या अश्विनी सांगळे,जान्हवी सोळकर,करिना देवकर या तीन विद्यार्थींनी व इयत्ता दहावी परीक्षेत पुनम भानुसघरे,मोनिका येवले,समीक्षा गरुड व बारावी परिक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या स्नेहल बोत्रे,सानिका जावळे,साक्षी येवले विद्यार्थी तसेच एन एम एम एस व समर्थ शलाका स्पर्धा परिक्षेतील जान्हवी सोलकर,शरण्या हुलावळे,तेजस बैकर शिष्यवृती परीक्षेत यश मिळवणा-या गुणवंत विद्यार्थी स्नेहल शिंदे,आर्या आहिरे,पल्लवी ढमाले व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेले संजय हुलावळे व उमेश इंगुळकर यांंच्यासह विविध बौद्धिक व क्रिडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दुपारच्या सत्रात विद्यार्थांंच्या विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,सुत्रसंचालन उमेश इंगुळकर,वैजयंती कुल यांनी तर आभार प्राचार्य संजय वंजारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय वंजारे,जेष्ठ शिक्षिका रेखा भेगडे शिक्षक प्रतिनिधी उमेश इंगुळकर,शिबीर प्रमुख छाया सोनवणे,सचिन हुलावळे,रोहित ढोरे यांंच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख वैजयंती कुल,अरुणा बुळे,संगीता खराडे,मच्छिंद्र बारवकर,विवेक भगत,काजल गायकवाड,रंजना नवाळे,सची दगडे,शिल्पा वर्तक,प्रणाली उंबरे,बाबाजी हुलावळे,उल्हास हुलावळे यांंच्यासह सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी परिश्रम घेतले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन