सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
आढे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतच्या सरपंच सुनिता ज्ञानेश्र्वर सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्य स्थरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२३ मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात समाजासाठी अपवादात्मक समर्पण, वचनबद्धता आणि महत्त्वपूर्ण योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महोदयांचा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्य स्थरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षी महाराष्ट्रातील १७ सरपंचांची निवड करण्यात आली.
निवडीमध्ये गावातील उत्कृष्ट कामगिरी, व्यवस्थापन, अंमलबजावनी,ग्रामपंचायत कार्याची माहिती याचा समावेश करण्यात आला होता.त्यामध्ये मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायत सरपंच सुनिता ज्ञानेश्र्वर सुतार यांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे
महापौर हॉल अंधेरी येथे डॉ.अविनाश सकुंडे ( मेंबर मायनॉरिटी कमिशन दिल्ली ), नासीर हुसेन ( क्राईम ब्रांच पोलीस इन्स्पेक्टर ), कादंबरी शुक्ला ( सिने अभिनेत्री ) तसेच विकास शिवाजीराव कडू पाटील ( अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ पुणे जिल्हा ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यात महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच पुरस्कार २०२३ सुनिता ज्ञानेश्र्वर सुतार यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट सरपंच म्हणुन आढे गावचे नाव महाराष्ट्रभर पोहोचविल्या बद्दल सरपंच सुनिता सुतार यांचे तालुक्यातून कौतुक केले जात असून नागरिकांनी या बाबत अभिनंदन व्यक्त केले आहे.मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायत च्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २२ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या गोदामचे काम पूर्ण झालें असून रोजगार हमी योजनेअंतर्गत गोदाम उभारणीचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला आहे.
याशिवाय गावातील विकास कामे,वृक्षारोपण,आरोग्य शिबीरे घेण्यात आली.गावातील सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सरपंच सुतार यांचा पुढाकार आहे.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष