मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभूळकर
वडगाव मावळ: कला  क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेल्या मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश शामराव जांभूळकर यांची निवड झाली आहे.मावळ फेस्टिवल यंदाचे सोळावे वर्ष आहे.हा सांस्कृतिक महोत्सव मावळकरांसाठी पर्वणी असतो.
मावळ फेस्टिवलचे संस्थापक प्रविण चव्हाण, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , मावळते अध्यक्ष किरण म्हाळसकर , मावळते कार्यक्रम प्रमुख ॲड.पवन भंडारी आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत यंदाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शुक्रवार दि. २६ ते रविवार दि. २८ जानेवारी २०२४ दरम्यान मावळ फेस्टिवल संपन्न होणार आहे.भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणारा हा सोहळा यावर्षी तितकाच दिमाखदार होणार आहे.नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी असणार आहे . सामाजिक दायित्व जपत तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळण्यासाठी अधिकाधिक चांगले कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी माहिती संस्थापक प्रविण चव्हाण यांनी दिली.
मुले , महिला ,युवक,ज्येष्ठ नागरिक या आबालवृद्धांना आवडतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व संचालक मंडळाच्या साथीने करण्याचा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश जांभूळकर यांनी व्यक्त केला.
मावळ फेस्टिवल संस्थेचे हे १६ वे वर्ष आहे.मनोरंजन, कला क्षेत्रासह यापूर्वी कोरोना काळातील वैद्यकीय आणि अन्न धान्य वाटप उपक्रम , गो दान , विविध क्रिडा स्पर्धा , विविध क्षेत्रातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करणे , यात्रेतील लहान मोठ्या व्यावसायिकांना अन्नदान ई अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून संपन्न झाले आहेत.
विवेक धर्माधिकारी , नामदेवसढोरे , नितीन कुडे, अरुण वाघमारे , शैलेंद्र ढोरे , रविंद्र काकडे , शंकर भोंडवे , भूषण मुथा , सागर जाधव , विनायक भेगडे आदि संचालक उपस्थित होते.

error: Content is protected !!