मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात कवी प्रा. प्रविण दवणे यांच्या हस्ते उद्घाटन
तळेगाव स्टेशन:
येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न झाले. पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.
यंदाचे स्नेहसंमेलन साहित्यातील नवरस या संकल्पनेवर आधारित होते. मानवी मनातील भाव- भावनांचे आकलन वेगवेगळ्या रसातून कसे अनुभवता येऊ शकते याचे विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले.जीवन हे नवरसांचे अलौकिक मिश्रण आहे.या प्रत्येक रसाचा आस्वाद मनुष्य एकदा तरी अनुभवतच असतो,याचा प्रत्यय या सादरीकरणावेळी प्रेक्षकांनी अनूभवला.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक, कवी प्रा. प्रविण दवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे,नंदकुमार शेलार,सोनबा गोपाळे गुरुजी, अविनाश पाटील,आदित्य खांडगे, सत्यम खांडगे ,सुनील वाळुंज,सुहास गरुड ,अनुपमा खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष गणेश खांडगे यांनी स्वागत केले.उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले.मान्यवरांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुखपत्र ‘मॅक्स व्हॉईस’ सन २०२३ -२४चे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नू.म.वि. प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने श्री. विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले
पूर्वप्राथमिक विभागातून त्रिशा सावंत, प्राथमिक विभागातून ग्याना यादव,माध्यमिक विभागातून भाग्यश्री कपाले, आणि शौनक जाधव या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.प्रमुख पाहुणे कवी प्रा. प्रविण दवणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत “नवीन पिढी घडविताना ” या विषयावर पालकांची काय भूमिका असली पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले. व शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली. नर्सरी दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अद्भुत,वात्सल्य,हास्य,करुण,वीर,शृंगार,भयानक,रौद्र ,आणि भक्ती या नवरसांवर आधारित अत्यंत समर्पक अश्या गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले.
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी हनुमानाची श्रीरामांवर असलेल्या भक्तीचा अविष्कार आपल्या नृत्यातून सादर केला. यावेळी प्रक्षेकांच्या डोळ्याची पारणे फिटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली ठाकूर,अंत्रा पाटील,अनुष्का जाधव,देवांशू अमोदे,विराज वासुदेव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!