एकादशी निमित्त कार्ल्यात दिंडी सोहळ्याचे आयोजन
कार्ल्यात अवतरली आंळदी
हरिनामाचा जयघोषाने दुमदुमली कार्ला नगरी
कार्ला:
एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता जुनिअर कॅालेजच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त दिंडीसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिडीं सोहळ्याने कार्ला गावाला आळंदीचे स्वरूप निर्माण होऊन वातावरण भक्तीमय झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱयांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये शाळेतील चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते तर संत ज्ञानेश्वर,नामदेव,तुकाराम,मुक्ताबाई या संताच्या वेषभुषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती.
सकाळी आठ वाजता कार्ला ग्रा सरपंच दिपाली हुलावळे उपसरपंच किरण हुलावळे ,सदस्या वत्सला हुलावळे,भारती मोरे,उज्वला गायकवाड मुख्याध्यापक संजय वंजारे पोलिस पाटील संजय जाधव, हभप शंकर महाराज हुलावळे,विष्णू महाराज हुलावळे,पांडुरंग हुलावळे मृदुंगवादक सचिन गायकवाड यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतीमचे व पालखीचे पुजन करण्यात आले.यावेळी देवघर येथील ह भ प अनंता महाराज शिंदे यांनी प्रवचनरुपी सेवा दिली.
यावेळी त्यांनी आपले आयुष्य सुंदर करायचं असेल तर आई वडील व शिक्षकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा असे विचार व्यक्त केले.
दिंडीचे हे आकरावे वर्ष असुन अनेक ठिकाणी गावाता दिंडीचे जोरदार स्वागत केले.
हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
महिलांनी जागोजागी पालखीची ओवाळणी करून पुजन केले.घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
पालखीचा समारोप कार्ला गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एकविरा विद्यालय शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांच्याहस्ते आरती घेण्यात आली व ग्रामपंचायतीच्या वतिने अल्पउपाहाराचे वाटप करत दिंडीची सांगता करण्यात आले.
दिंडी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापक संजय वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख उमेश इंगुळकर संजय हुलावळे ,मच्छिंद्र बारवकर,विवेक भगत,सचिन हुलावळे,अनिल चौधरी,रेखा भेगडे,वैजयंती कुल,संगीता खराडे,अरुणा बुळे,काजल गायकवाड,छाया सोनवणे बाबाजी हुलावळे,उल्हास हुलावळे,वाघवले मामा, प्रणाली उंबरे,शिल्पा वर्तक,वैजयंता शेवाळे, यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका-शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी नियोजन केले होते.
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार