पिंपरी:
तळवडे येथे वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्तीच्या कंपनीमध्ये भीषण स्फोट होवून. यामध्ये ७ महिला कामागारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे.
या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या. स्फोटाच्या आवाजाने हा शटर बंद झाला आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. काही महिला अजूनही जखमी आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, आणि राजकीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तळवडे येथील दुर्घटनेत शिल्पा राठोड,प्रतीक्षा तोरणे,अपेक्षा तोरणे,कविता राठोड,रेणूका राठोड,शरद सुतार,कोमल चौरे,उषा पाडवे,सुमन,प्रियंका यादव जखमी झाल्या आहेत.

error: Content is protected !!