तळेगाव स्टेशन:
येथील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला ‘सहकार विघ्नहर्ता पुरस्काराने ‘सन्मानित करण्यात आले.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.
आमदार अतुल बेनके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आले.राज्य सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,अप्पर आयुक्त व निबंधक महा. राज्य पतसंस्था कृष्ण वाडेकर,पुणे विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, ग्रामीण
जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप जुन्नर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ,सहायक निबंधक सचिन सरसमकर, सहकार अधिकारी संतोष भुजबळ, बाळासाहेब तावरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भोर
,विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंध सहकारी संस्था आंबेगाव
, शिरीष पोळेकर जनरल मॅनेजर जनसेवा सहकारी बँक पुणे, तानाजी कवडे सहनिबंधक लेखापरीक्षण विभा, सुरेखा लवांडे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र फेडरेशन उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.या बाबतची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली होती.
संस्थेची आर्थिक स्थिती,उत्तम आर्थिक व्यवस्थापन, व्याज तसेच संशयित बुडीत निधीची शंभर टक्के तरतुद,निधी, ठेवी, गुंतवणूक, कर्ज यामध्ये दरवर्षी होणारी वाढ या बाबींची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेच्या स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग अ संस्थेला मिळत आहे.याशिवाय संस्थेची सामाजिक बांधिलकी सर्वश्रुत आहे.या सर्व पाश्र्वभूमीवर संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे असून उपाध्यक्ष नंदकुमार अण्णासाहेब शेलार,सचिव अविनाश अरविंद पाटील,खजिनदार विनायक वसंतराव कदम हे आहेत. संचालक म्हणून रोहिदास तुकाराम गाडे, महेंद्र छगनलाल ओसवाल, समीर हरिश्चंद्र खांडगे, राजू धोंडीबा खांडभोर, सुहास बळीराम गरुड, प्रशांत चंद्रकांत भागवत, रमेश दगडू जाधव, वर्षा सत्यजित वाढोकर हे काम पाहत आहे.तर गणेश दत्ताराम घारे संस्थेचे व्यवस्थापक आहे.संचालक सुहास गरुड प्रशांत भागवत,व्यवस्थापक गणेश घारे चंद्रकांत पडवळ विनायक भेगडे अमोल भेगडे यावेळी उपस्थित होते.
संस्थेचे संचालक मंडळ,सर्व शाखा प्रमुख,वसुली अधिकारी,बचत प्रतिनिधी,सभासद या सर्वांच्या प्रमाणिक कामांमधून हा पुरस्कार मिळत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला
जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार मिळाला.सर्व संचालक मंडळ,शाखा व्यवस्थापक,शाखाप्रमुख,कर्मचारी,दैनंदिन प्रतिनिधी यांच्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश आहे.ठेवीदार,कर्जदार आणि सभासद यांची विश्वासार्हतेला हा पुरस्कार समर्पित करीत आहोत.या सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाने पतसंस्थेच्या यशात असे मानाचे तुरे रोवले जात आहे.असेच प्रेम आणि सदिच्छा सोबत आहे ती कायम असेल असा विश्वास आहे.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन