गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन
पिंपरी:
गेली पाच वर्षे पिंपरी चिंचवड मध्ये मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या गझलपुष्प कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, संस्थेचा पाचवा वर्धापनदिन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० ह्यावेळेत संपन्न होणार आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळालेल्या गझलपुष्प संस्थेचा वर्धापनदिन हा एक महत्त्वाचा समारंभ असतो. संस्थांमार्फत *गझल प्रचार व प्रसार पुरस्कार* सुप्रसिद्ध गझलकार मा. डॉ शिवाजी काळे (रा.राशीन) ह्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
तसेच सर्वप्रथम ज्यांनी मराठी गझल स्वरबद्ध करून सादर केली ते सुप्रसिद्ध गझल गायक, संगीतकार ‘गझलगंधर्व’ श्री. सुधाकर कदम सर यांच्यांशी मुलाखतीतून ‘सूर-संवाद’ हितगूज, सुप्रसिद्ध गझलकार अभिजीत काळे यांच्या “मनाचा गूढ गाभारा” या पहिल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन, गझलपुष्प गझल लेखन स्पर्धा पुरस्कार वितरण आणि तीन राज्यस्तरीय गझल मुशायरे संपन्न होणार आहेत.
या सोहळ्याला उद्घाटक म्हणून युवानेते विश्वजीत बारणे, उद्योजक राहुल पांचाल, उद्योजक विलास शिंदे, संजय चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अभय पोकर्णा, सामाजिक कार्यकर्त्या वैभवी सुर्वे उपस्थित राहणार आहेत. तसेच ह्या सोहळ्याला सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे, डॉ स्नेहल कुलकर्णी, शाम खामकर, शिव डोईजोडे, अमोल शिरसाट, आत्माराम जाधव, सारंग पांपटवार असे राज्यभरातील गझलकार उपस्थित राहणार आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड साहित्य वर्तुळातील श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, रमेश वाकनिस, धनंजय भिसे, सविता इंगळे, शोभा जोशी, उज्ज्वला केळकर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित