संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप बबनबुवा भानुसघरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
लोणावळा-
मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील जेष्ठ वारकरी व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक हभप बबनबुवा विष्णू भानुसघरे यांचे सोमवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सकाळी गावातील मंदिरात काकड आरती चालू असतानाच त्यांना त्रास सुरु झाला होता मंदिरातील पूजा आटोपून ते घरी गेले असता त्यांना हृदय विकाराचा झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवले परंतु तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
मावळ तालुक्यात वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते अनेक गावातून त्यांनी प्रवचन व भजन करत समाजप्रबोधन केले.नवमी भजनी मंडळ भांगरवाडी लोणावळा यांचे ते सदस्य होते व संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसाई या ठिकाणी त्यांनी संस्थापक विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा रामदास भानुसघरे व रोहिदास भानुसघरे तसेच मुली सूना नातवंडे असा मोठा परीवार आहे त्यांच्या आकस्मित जाण्याने मावळ तालुका वारकरी संप्रदायाचा मोठी हानी झाली आहे.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!