वडगाव मावळ:
मावळ तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची साक्ष जपणारी वडगाव मावळ नगरी सर्वश्रुत आहे.
या नगरीत संघर्ष योद्धा,सकल मराठा समाजाची मुलुखमैदान तोफ मनोज जरांगे पाटील यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश लाभेल असे पोटोबा महाराजाच्या चरणी साकडे घातले.
या प्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव,माजी उपसरपंच बुवा ढोरे,दिनेश ठोंबरे,भाऊ ढोरे,अशोक सातकर,गणेश थिटे,अनिल मालपोटे आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!