तळेगाव स्टेशन:
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्व.किशोर आवारे यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प..भास्करराव रसाळ यांचे प्रवचन झाले.राम कृष्ण हरीचा गजर करीत प्रवचनाची सुरुवात झाली.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे,उद्योजक रामदास काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,उद्योजक बाळासाहेब काकडे,सत्यशीलराजे दाभाडे सरकार,माजी नगराध्यक्ष सुरेख जाधव ,गडसिंग साहेब माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर,ज्येष्ठ नेते विष्णू खांदवे, भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, मनोहर ढमाले,यूवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, यांच्यासह शहरातील नागरिक,जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,आवारे कुटूबियांचे आप्तस्वकीय,नातेवाईक,सगेसोयरे,स्व.किशोर आवारे मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
ह.भ.प.भास्करराव रसाळ म्हणाले,” स्व.किशोर आवारे यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या हा गोतावळा म्हणजे हीच खरी संपत्ती आहे. आवारे यांनी पन्नास वर्षात केलेले काम अवर्णनीय आहे.रसाळ महाराज यांनी आवारे यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडून दाखविले.
गुरुदत्त भजनी मंडळ व रखूमाई भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.माही फाऊंडेशन व नैसर्गिक शिक्षण संस्थांना मदतीचा हात देण्यात आला.
उद्योजक रामदास काकडे म्हणाले,” स्व.किशोर आवारे हे देशाची सेवा करणारे सहृदय युवक होते.मदतीला धावून हा त्यांचा पिंड होता. सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे किशोर आवारे यांचा सामजिक पिंड होता.स्व.किशोर आवारे यांच्या आजी शांताबाई पुसाणे गावच्या सरपंच होत्या.आई सुलोचना ताई आवारे तळेगावच्या नगराध्यक्ष होत्या.तर वडील कै.गंगाराम आवारा कामगार नेते होते.हीच सामाजिक बांधिलकी मानणारा हा तरूण शेवटच्या क्षणापर्यंत मदतीला धावला.
दिनेश ठोंबरे यांनी शिववंदना घेतली. किशोर भाऊचे काम चालू ठेवणार असल्याची ग्वाही माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी प्रास्ताविकात दिली.सुत्रसंचालन कल्पेश भगत यांनी सुत्रसंचालन केले .
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष