आनंददायी भेट
मी गावा पासून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर शेतात राहतो.शेतात तीन चार घरे आहेत.घरापासून पश्चिम पट्ट्यातील गावाकडे रस्ता गेलेला आहे.या रस्त्याचे काम होऊन दहा ते पंधरा वर्षे झाले होते.रस्ता पूर्ण डांबर उखडलेल्या अवस्थेत दिसून येत होता.घरापासून गावात जायचे म्हंटले की मोठ्या यातना सहन कराव्या लागत होत्या.
असाच एक रविवार होता.सदिच्छा रुपी एक मेसेज आम्ही दिलीप दादा मेदगे यांना पाठवला होता. व त्याच बरोबर आम्ही त्यांना त्या रस्त्याची कल्पनाही दिली होती.दिलीप दादाचे गाव कुडे बुद्रुक म्हणजेच त्याच रस्त्याने त्यांना जावे लागत होते.
दिलीप दादांनी उत्तर दिले होते,या बजेट मध्ये आम्ही प्रयत्नात आहोत. तो घाट क्राँकी टी करन होणे गरजेचे आहे.मेसेज टाकून झाल्यानंतर आम्ही मात्र त्या प्रतिक्षेमध्ये होतो की कधी ते काम होईल?दोन महिने गेले असतील आम्हाला गावा वरून फोन आला रस्त्याचे काम चालू झाले आहे.खूप चांगल्या प्रकारे काम चालू झाले आहे.
एक ते दीड महिन्यात ते पूर्ण झाले होते.ज्या रस्त्याने गावात जाण्यास पंधरा मिनिटे लागणार होते त्या रस्त्याने आम्हाला आता पाच ते दहा मिनिटात जाता येऊ लागले होते.रस्त्याने जाताना मात्र दिलीप दादांच्या त्या मेसेज ची आठवण येत होती.शब्द किती महत्वाचा असतो,हे आम्हाला त्यांच्या कृतीतून दिसून आले होते.त्यानंतर आम्ही त्यांना मेसेज न करता त्यांच्या बरोबर फोन द्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला दिलीप दादा म्हणजे एक मिनिट त्यांच्या कडे अत्यंत महत्वाचा असतो.
मात्र आम्ही त्यांना फोन केल्या बरोबर त्यांनी तो रिसिव्ह केला आणि पाच ते दहा मिनिटे मनसोक्त गप्पा झाल्या होत्या.आमच्या लेखणीला दाद देताना त्यांनी सोशल मीडिया मधून कौतुक केले होते. मग त्या घाटाचे वळण व त्या वरील तटबंदी याच्या बद्दल त्यांनी चर्चा केली होती.
देश भरा तील दिवाळी सणाचे पर्व साजरे होत असताना आमची पाऊले आमच्या जन्मभूमी त गावा कडे वळली होती.
काही कामानिमित्त ज्यावेळी आम्ही गावात जाण्यास निघालो त्यावेळी समोर दिलीप दादा आणि त्यांच्या बरोबर काही मंडळी घाटाच्या माथ्यावर जमा झालेली दिसत होती.आम्हाला पाहिल्या बरोबर त्यांना मोठे हायसे वाटले होते.आमची सुध्दा त्यांच्याच सारखी परिस्थिती झाली होती.गावा कडचे वातावरण आल्हाद दायक, निळे भोर आकाश,लक्ख सूर्य प्रकाश,आजू बाजूला असणारी गर्द झाडी,रानातील हिरवे गार गवत,अशा या मनमोहक अंदाजात त्यांची आणि माझी ऐतिहासिक भेट झाली होती.
ऐतिहासिक याच्या करता की आम्ही सोशल मीडिया द्वारे संपर्क साधत होतो पण प्रत्यक्ष भेटीची ही पहिलीच वेळ होती म्हणून हा उल्लेख करावा लागतो आहे.भेट झाल्या नंतर त्यांनी जो लोखंडी तटबंदी चा प्रस्ताव ठेवला होता.त्या प्रस्तावाला न्याय देत असताना ते काम चालू होते.हे पाहून आमच्या समोर मावळ मातीतील छत्र पती शिवाजी महाराज उभे राहिले होते.छत्र पतीने हिंदवी स्वराज्याची शपथ अवघ्या बारा मावळ्यांसोबत घेतली होती.सगळी कडे यवन आक्रमण करत होते.
मराठी समाज भरडला जात होता.अशा वेळी छत्र पती नी ही शपथ घेतली होती.दिलीप दादा मेदगे जिल्हा नियोजन समितीवर काम करतात.कोणतेही राजकीय लोक प्रतिनिधी नसताना त्यांनी हे कार्य अवलंबले आहे.मग बरीच विस्तृत चर्चा झाली दिवाळीचा गोड फराळ त्यांना घरी आणून दिला,हा फराळ त्यांनी सेवन केला होता.काही कालावधी त त्यांनी पलायन सरळ त्यांच्या पितृ गावा कडे केले होते.
शब्दांकन: बाळासाहेब मेदगे
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार