३५०  व्या राज्याभिषेका निमित्त महर्षी कर्वे आश्रम शाळेत साकारली भव्य रायगड प्रतिकृती
कामशेत:
येथील महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळेच्या प्रांगणात  शाळेतील ४३६ विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस अथक श्रमदान करून  ३५०  फूट भव्य दिव्य अशी रायगड किल्ल्याची प्रतिकृती  उभी केली.आणि. ३५० वा राज्याभिषेक दिमाखात सादर करून यावर्षीचा  दीपोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महर्षी अण्णा कर्वे ,बाया कर्वे व भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन ॲड. किरण गभाले, बाळासाहेब लोहकरे , प्रदीप वाजे, सीमा कांबळे, धनंजय वाडेकर  विक्रम  बाफना, नवनाथ ठाकर शाळेच्या मुख्याध्यापिका  अनिता देवरे शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम  पवार यांच्या  हस्ते  करण्यात झाले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या मुलींनी आश्रम गीताने केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे समन्वयक श्री. दत्ताराम जाधव यांनी केले .तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत बुरांडे यांनी करून दिले .
यावर्षी शाळेमध्ये वर्षभर पर्यावरण संरक्षण कार्यक्रम राबवण्यात आलेले होता.पर्यावरणातील पक्षी, प्राणी ,झाडे यांची संख्या वरच्यावर कमी होत चाललेली आहे. म्हणून शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एक संकल्प राबवलेला आहे. प्रत्येकाने एक झाड लावणे व एक चिमणीचे घरटे आपल्या घराच्या परिसरात लावणे ही संकल्पना धनंजय वाडेकर यांनी सुचवली.
ही संकल्पना सर्वांनाच आवडली आणि ती प्रत्यक्ष अंमलात आणली .यावर्षी दीपोत्सवामध्ये पर्यावरण संरक्षण ही संकल्पना राबवून त्याची प्रतिकृती रांगोळीमध्ये  पर्यावरणातील चिमणी, वाघ ,झाडे  आणि साप हे रांगोळीमध्ये  रेखाटली.  शाळेतील साक्षी मेंगाळ या चिमुकलीने चिमणीची वेशभूषा करून चिमणीचे दुःख सांगितले, गायत्री बांगारे हिने वाघाची वेशभूषा करून पर्यावरणात वाघाचं महत्त्व व वाघाच्या मनातील शल्य मनोगतातून व्यक्त केले तसेच काजल दाते हिने झाडाची वेशभूषा करून झाडाचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बाळासाहेब लोहकरे यांनी मार्गदर्शन करत असतांना चिमुकल्या कलाकारांचे, शाळेतील सर्व विद्यार्थी , शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे व शाळा समितीचे पदाधिकारी यांचे कौतुक करून पर्यावरणाचे महत्त्व, जनजाती समाजातील सकारात्मक बदल व विद्यार्थीनींना प्रेरक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष ॲड. किरण गभाले यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले गुण विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत पटवून दिले. शाला समितीचे अध्यक्षा व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या सीमा.कांबळे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले.
तसेच सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ३५० वा राज्याभिषेक सोहळ्याचे अतिशय सुंदर अशा पद्धतीने सादरीकरण केले. या भव्य कार्यक्रमाचा समारोप शिवरायांची आरती व दीपोत्सवाने झाला. शाळेचा परिसर व रायगड प्रतिकृतीवर ५००० पणत्या पेटवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दीपोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. या कार्यक्रमाचे आभार शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक  तुकाराम  पवार यांनी  मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीना मोहिते व अनुजा वाजे या विद्यार्थीनींनी केले.

error: Content is protected !!