वडगाव मावळ:
मावळ तालुका आय काँग्रेस पक्ष आदिवासी सेलच्या अध्यक्षपदी बबनराव लक्ष्मण हेमांडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ यांनी दिले. हेमाडे हे वडेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास  काकडे,ज्येष्ठ नेते पै.चंद्रकांत सातकर, पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रोहिदास वाळुंज, माजी अध्यक्ष खंडू तिकोणे, दिलीप ढमाले युवक अध्यक्ष राजेश वाघोले, महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, प्रवक्ते मिलिंद अच्युत  उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष बबनराव हेमाडे म्हणाले,” काँग्रेसचा विचार घेत आम्ही गावपातळीवरील राजकारणात सक्रीय राहिलो. या विचाराला सेवाकार्याची जोड दिली.

error: Content is protected !!