टाकवे बुद्रुक :
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतच्या 19 सार्वत्रिक व 10 ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूक  त्यापैकी 4 ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध तसेच 5 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक बिनविरोध झाल्या आहे.
या मध्ये आंदर मावळ मधील कल्हाट, कोंडीवडे येथे निवडणूक पार पडली. तर सावळा येथे एक जागेवरील पोट निवडणूक बिनविरोध झाली.
येणाऱ्या काळात औद्योगिक परिसर म्हणून ओळख मिळणाऱ्या कल्हाट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवाजी तानाजी करवंदे यांची विक्रमी मतांनी निवड झाली. यापूर्वी भाजपच्या ताब्यात असलेल्या कल्हाट ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावातून मोठा जल्लोष करत ढोल-ताशाच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.
विजयी उमेदवार कल्हाट पुढीलप्रमाणे-
सरपंच शिवाजी तानाजी करवंदे -761.
सदस्य- सोमनाथ सबाजी आगिवले 291
सदस्य- कल्पना किसन यादव 292
सदस्य- सुनीता पांडुरंग धनवे 291
सदस्य- देवदास रोहिदास धनवे 165
सदस्य – रंजना संतोष पवार 189
सदस्य- बीभिषण तारु पवळे 185
सदस्य -मनीषा संतोष पवळे 226
विजयी उमेदवार कोंडीवडे पुढीलप्रमाणे
सरपंच राधा विश्वनाथ मुंढारकर. 331.
सदस्य किरण किसन तळवडे. 100.
पुढील सर्व सदस्य बिनविरोध
अरुण वसंत तळवडे,
उर्मिला काळूराम तळवडे,
राधिका संजय तळवडे,
अजित बाळू कडू,
पुष्पलता योगेश कडू,
माधुरी राजेंद्र तळवडे.
सावळा पोटनिवडणूक एक जागेसाठी बिनविरोध
मनीषा दशरथ आढारी.
राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय तळेगाव दाभाडे या ठिकाणी करण्यात आला. तसेच आमदार शेळके यांनी बोलताना सर्व सरपंच व सदस्यांना सांगितले आहे गट तट न पाहता गाव गाडा पाहून गावच्या
विकासासाठी जो निधी लागेल तो मी उपलब्ध करून देण्याचा  नक्कीच प्रयत्न करेल  असा विश्वास दिला.

error: Content is protected !!