वडगाव मावळ:
मावळ तालुका काँग्रेस आय जेष्ठ नागरिक सेलच्या   अध्यक्षपदी बंडोबा मारुती मालपोटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिले. यावेळी प्रमुख उपस्थित ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर , उद्योजक रामदास काकडे ,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी राक्षे ,जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज ,तालुका सांस्कृतिक सेना अध्यक्ष सहादू  आरडे ,आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बबन हेमाडे उपस्थित होते.
बंडोबा मालपोटे कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी संचालक असून संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहे.ग्रामीण भागात त्यांनी काँग्रेसचा विचार रूजवला.काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ही सक्रीय होते.

error: Content is protected !!