H20 फाउंडेशन तर्फे दिव्यांगाना दिवाळी भेट
टाकवे बुद्रुक:
दिवाळी निमित्त सर्वत्र आनंद असतो.पण गरिबांची देखील दिवाळी गोड व्हायला हवी,यासाठी. H2O फाउंडेशन तर्फे दिवाळीचे पदार्थ व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. माळेगांव खुर्द, कुणेवाडी, तळपेवाडी (ता.मावळ) या आदिवासी गावांत H2O FOUNDATION ने दिवाळीचे साहित्य,फराळ, किराणा साहित्य प्रत्यक्ष येऊन वाटप केले. H2O फाउंडेशनचा हा उपक्रम खरोखरच सामाजिक सलोखा, अस्मिता जपणारा आहे. स्नेह वाढविणारा आहे.
या प्रसंगी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी
सेक्रेटरी निरंजन सातकर व सभासद सतिश टकले , योगेश कोतकर,निलेश उगवे , किरण देसाई, वैभव दराडे , मयुर कोतकर व परिवार उपस्थित होते.
पंचायत समिती मावळचे माजी सभापती शंकरराव सुपे यांनी H2O FOUNDATION चे अध्यक्ष प्रविण साळवी व H2O परिवार सदस्यांचा सत्कार केला. उपक्रमाचे कौतुक बाजीराव सुपे यांनी केले. या वेळी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष व ग्रा.प.सदस्य शंकर बोऱ्हाडे, समन्वयक राष्ट्रवादी आदिवासी सेल चे अध्यक्ष सोपान गोंटे किसन सुपे, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन