वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील सुदवडी,सुदुंबरे,जांबवडे,आंबळे सह अन्य ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले.लोकशाहीचा उत्सव सर्वत्र पहायला मिळाला.गावचा कारभारी कोण होणार ही उत्सुकता वाढली आहे.गावच्या भावी कारभा-याचे भविष्य मतपेटी बंद झाले आहे.आज झालेल्या मतदानाची उद्या मत मोजणी होणार आहे.सरपंच आणि सदस्य पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी देवाला साकडे घातले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली मेहनत फळाला येईल का कडे पॅनल प्रमुखांचे लक्ष आहे.डाव प्रतिडावाच्या खेळात कोण बाजी मारणार या बाबतची आकडेमोड सुरू आहे.कोण आपला कोण परका याचे आखाडे बांधले जात आहे.गावपातळीवरील निवडणुकीत पक्षीय धोरण नसतेच.येथे असतो फक्त गावकी भावकीचा कल.या कलाला अनुसरून मतदान होते.
पक्षीय राजकारण गावात नसेल तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वेला मंडळाचा किंवा प्रतिष्ठान,युवा मंच अथवा स्नेह ग्रुपचा कार्यकर्ता व्हावे लागते.तेव्हा कुठे गावपातळीवरील राजकारणात प्रवेश मिळतो.ही पहिली पायरी तर दुसरी पायरी राजकीय पक्षाचा पदाधिकारी ही आहे.या पायरीत विद्यार्थी किंवा युवक संघटनेचा कार्यकर्ता व्हावे लागते.आणि मग गावातील विकास कामांचा पाठपुरावा आपल्या राजकारणातली गाॅड फादर कडे केला की उमेदवारी बसते.
हे सगळे झाले तरी शेवटी मत मागायला गावकी भावकीच्याच दारात जावे लागते.त्यामुळे या निवडणुकीला गावकी भावकीच्या राजकारणाची किनार असते.या निवडणुकीत आढले बुद्रुक,बेबडडोहळ सह अन्य ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध झाल्या आहे.शिरगाव व पाचाणे ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक देखील बिनविरोध झाली आहे.असे असले तरी इतर निवडणुकीत लाखो रूपयांचा खर्च झाला असल्याची तालुकास्तरावर चर्चा आहे.
निवडुणक कोणतीही असो,ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राहिली नाही,असे सगळे बाराही महिने बोलत असतात. पण हाच सर्वसामान्य कार्यकर्ता सतरंज्या उचलत असतो.तोच गावकीच्या आणि भावकीच्या कामाला येतो.तोच राजकिय मंडळीच्या भाषणाला कडकडाटात टाळया वाजवतो.पण हाच कार्यकर्ता मान सन्मानाच्या वेळी दूर असतो.
ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या बळावर जिंकली अशी स्टेटमेंट येतील. पण जिथे बिनविरोध निवडणूक होतात तेथे हेच सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र कुठचे कोणाच्या नजरेत दिसत नाही हेही वास्तव नाकारून चालणार नाही.विधानसभा लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भरभरुन मतदान झाल्याचे दिसते.उमेदवार आणि समर्थक मतदानाच्या आदल्या रात्री झोपलेच नाही.मतदान करण्याच्या शेवटच्या वेळा पर्यत कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी धावपळ करीत होते.सकाळच्या प्रहरी मतदानाचा जोर कमी होता.दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यत मतदानाचा उत्साह वाढत गेला.जांबवडे ,सुदवडी,सुदुंबरे,मळवंडी पमा,दिवड,डोणे,साळुंब्रे ,कोडिंवडे अमा ,कल्हाट,आंबळे,शिळींब ,उदेवाडी,मुंढावरे,भाजे ,सांगिसे या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक झाली.तर चिखलसे,दारुंब्रे,कान्हे,खांडशी,कुसगाव बुद्रुकची पोटनिवडणूक झाली.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित