आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते Savibhar Oil Companyचे उद्घाटन
सोमाटणे:
येथील भरत मु-हे व सिद्धेश मु-हे  यांच्या Savibhar Oil Companyचे आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक माऊली दाभाडे यांच्या हस्ते
उद्घाटन झाले.
यावेळी ज्येष्ठ किर्तनकार शंकर महाराज मराठे, नगराध्यक्ष मयूर ढोरे,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे,बबनराव भोंगाडे,गुलाबराव म्हाळसकर,सुलोचना आहेर,
,स्वाती कांबळे,नितीन मु-हे ,निलेश राक्षे,शांताराम भोते, शाबू मु-हे,दत्तात्रय हजारे,बळिराम मराठे, प्रभाकर काकडे,नंदन रेगे,उद्धव चितळे,गुलाब मु-हे, विक्रम कलवडे,राजू मु-हे ,विष्णू मु-हे,जीवन घारे,भरत ठाकुर,सचिन मु-हे,संतोष मु-हे,संतोष शेलार आदि उपस्थित होते.
आमदार शरद सोनवणे म्हणाले,”माझ्या बालपणाचा मित्र यशस्वी उद्योजक झाला याचा मला अभिमान आहे.शाळेच्या एकाच बाकावर बसून आम्ही शिकलो.जीवनातील सुखाचे  दु:खाचे प्रसंग त्याने पाहिलेत .त्याच्या संघर्षाचे आम्ही साक्षीदार आहोत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकचे संचालक माऊली दाभाडे म्हणाले,” शेतीला व्यवसायाची जोड दिली तर उत्तम प्रकारे प्रपंच करता येतो, हे मु-हे त्यांच्या कार्यातून सिद्ध झाले.
मधुसूदन बर्गे म्हणाले,” स्वतःच्या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे.शेतकरी पुत्राने उभे केलेले हे काम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
तहसीलदार सुनंदा भोसले,संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,गणेश(आप्पा)ढोरे,छबुराव भेगडे,सागर पवार,
,भिवाजी राक्षे,बजरंग मेकाले,
यांच्यासह अन्य मान्यवरांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मु-हे कुटुंबियांच्या या आनंद सोहळ्यात आप्तेष्ट,नातेवाईक,सगेसोयरे,मित्रमंडळी सहभागी झाले होते.अत्यंत उत्साही व प्रसन्न वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.भरत मु-हे
यांनी प्रास्ताविक केले. अनिल धर्माधिकारी
यांनी सुत्रसंचालनकेले.सिद्देश मु-हे  यांनी आभार मानले.

error: Content is protected !!